चोपडा तालुका नाभीक समाजातर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थीच्या गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.

चोपडा तालुका नाभीक समाजातर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थीच्या गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.


चोपडा ( प्रतिनिधी) समाजातील गुणवंत 60 विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा दि,16 रोजी नगरपालिकेच्या श्रीमती शरदचंद्रिका पाटिल सभागृहात आयोजित करण्यात आला होता, यावेळी पिंपळनेर तालुक्यातील सामोडा येथील महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग तर्फे उत्तीर्ण होवून आयकर विभागात रुजु होणाऱ्या कु,धनश्री सेंदाने यांच्या सह तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांना स्मूतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले, तसेच समाजातील जेष्ठ नागरींकांचा सत्कार देखील करण्यात आला, यावेळी कु,धनश्री सेंदाने यांनी आपल्या मनोगतात सांगितले की घरची परिस्थिती साधारण असतांना देखील माझ्या आई वडील यांनी माझ्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले, त्यामुळे मी आज या पदावर जाऊ शकली, घरची परिस्थिती गरीबीची असली तरी मनात ध्येय राहिले तर आपणही कोणतेही उद्दिष्ट साध्य करू शकतो असे त्यांनी सांगितले, तसेच तालुका अध्यक्ष रवींद्र सेंदाने यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना सांगितले की समाजाच्या प्रत्येक विद्यार्थी यांनी शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवे कारण शिक्षणाशिवाय भविष्यात पर्याय नाही, आज कु ,धनश्री सेंदाने व समाजातील गुणवंत विद्यार्थी यांच्या सत्कार करताना खरोखर आनंद होत आहे असे त्यांनी सांगितले,यावेळी कु,धनश्री सेंदाने यांचे वडील नागेश सेंदाने व आई कोकिळा बाई सेंदाने,सोपान बाविस्कर, सुभाष सेंदाने, नंदलाल वाघ,तालुका अध्यक्ष रवींद्र सेंदाने,तालुका उपाध्यक्ष न्यानेश्वर सोनवणे,राजेंद्र निकम,राजू येशी, दत्ता सेंदाने, अनील पवार, हिरालाल सोनवणे, विनोद निकम,डॉ, ललित सेंदाने, सुभाष सेंदाने,आधार वसाने, शहर अध्यक्ष मनोहर सोनगिरे, उमाकांत निकम,बापु पवार, दिनेश जगताप, देवीदास बाविस्कर, किरण शिरसाठ, यांचा सह सर्व समाज बांधवांनी उपस्थिती होती,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव सर व आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष रवींद्र सेंदाने यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More