दिलासादायक वृत जळगाव : मृत्यू झालेल्या दोघाही कोरोना संशयितांचा अहवाल निगेटिव्ह

दिलासादायक वृत जळगाव : मृत्यू झालेल्या दोघाही कोरोना संशयितांचा अहवाल निगेटिव्ह

*इतर १४ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.*

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संशयित म्हणून दाखल असलेल्या दोन रूग्णांचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला होता.

या संशयितांच्या तपासणीचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. या दोघांसह इतर १४ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच एका कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. यानंतर जिल्हा रूग्णालयात दोन रूग्ण दाखल झाले होते. त्यांचे सँपल घेण्यात आले होते, मात्र रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. अशातच दोन दिवसापूर्वी या दोघ संशयित रुग्णांचा रात्री उशीरा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या संदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे महा अधिष्ठाता डॉ. भास्कर खैर यांनी रूग्णालयात दोघांचा मृत्यू झाला असून त्यांना संशयित म्हणून दाखल केले होते या माहितीला दुजोरा दिला. तथापि, या दोघांचे स्वप सँपल पाठविण्यात आले असून याचा रिपोर्ट येणे बाकी असल्याचे याबाबत आजच विधान करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमि आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास या दोन्ही रूग्णांच्या कोरोना चाचणी अहवाल आला. यात चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने हे दोन्ही रुग्ण कोरोनाच्या संसर्गामुळे न दगावल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील एक रूग्ण ही ६५ वर्षांची महिला होती.
तिचा मृत्यू उच्च रक्तदाबाने झाला आहे. तर दुसरा ३३ वर्षे वयाचा रूग्ण हा अल्कोहोलीक सिंड्रोममुळे मृत्युमुखी पडल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, दोन्ही रूग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणांचा जीव भांड्यात पडला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More