प्रताप विद्या मंदिराची पुनश्च गरुड झेप!!….


प्रताप विद्या मंदिराची पुनश्च गरुड झेप!!…..

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी


दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी इतिहास शिक्षक महामंडळ महाराष्ट्र शाखा पुणे द्वारे आयोजित राज्यस्तरीय इतिहास प्रज्ञाशोध परीक्षेत चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराच्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर गरुड झेप घेतली आहे.

गेल्या अकरा वर्षापासून प्रताप विद्या मंदिरातील इ. ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर आपला ठसा कायम ठेवत ,२०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात देखील आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे.यात इयत्ता ८ वी फ चा विद्यार्थी चि.मगरे शिवकुमार मधुकर याने १०० /९५ गुण प्राप्त करून संपूर्ण राज्यातून आठवी गटात प्रथम क्रमांक तर इयत्ता दहावी ई ची विद्यार्थिनी कु.प्रिया सचिन चौधरी हिने १०० /९८गुण प्राप्त करीत दहावीच्या गटातून राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला जिल्हा व तालुका स्तरावरील निकाल अजून प्राप्त झालेला नसून राज्यस्तरीय यादी नुकतीच जाहीर झालेली आहे.

या दोन्ही विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन…. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सर्व इतिहास शिक्षक बंधू-भगिनी व इतिहास विषय प्रमुख पी व्ही जोशी सर यांनी केले त्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ शैलाबेन मयूर ,चेअरमन राजाभाई मयूर उपाध्यक्ष मा. श्विश्वनाथ अग्रवाल, , संस्थेच्या सचिव मा. माधुरीताई मयूर , सदस्य चंद्रहासभाई गुजराथी, भूपेंद्रभाई गुजराथी, रमेशभाई जैन, प्रशालेचे मुख्याध्यापक पी एस गुजराथी ,उपमुख्याध्यापक एस जी डोंगरे ,ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य जे एस शेलार,पर्यवेक्षिका श्रीमती एम डब्ल्यू पाटील, पर्यवेक्षक एस एस पाटील ,पी डी पाटील संस्था समन्वयक गोविंदभाई गुजराथी, डी टी महाजन सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More