मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चोपडा यांचा शिक्षक भरती प्रकरणी शिक्षण अधिकाऱ्यांनी 10 शिक्षण सेवकांची व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मान्यता प्रस्ताव केली रद्द…

मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चोपडा यांचा शिक्षक भरती प्रकरणी शिक्षण अधिकाऱ्यांनी 10 शिक्षण सेवकांची व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मान्यता प्रस्ताव केली रद्द…

चोपडा बोगस शिक्षण सेवक भरती प्रकरणी मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांनी शिक्षण सेवक मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले होते सदर प्रस्तावाचे अवलोकन केले असता या शैक्षणिक संस्थे मध्ये संस्था चालक यांचे व्यवस्थापन मंडळात वाद असून, मुख्याध्यपक व काही संस्थाचालक यांचे समंती शिक्षक व शिक्षकेत्तर भरती करणेत आलेली दिसते. व सदर भरती स मान्यता न देणे बाबत तक्रारदार शेख चिरागोद्दीन इजाबदिन शेख यांचा अर्ज प्राप्त आहे.

त्यानुसार संस्थेस व मुख्याध्यापक यांना मान्यता देता येणार नाही या बाबत यापूर्वोच कळविणेत आलेले होते. शिक्षण अधिकारी यांनी सय्यद मसरत अली हजरत अली, उपशिक्षक
मजहर खाम शकील खात, उपशिक्षक
श्रीमती नाजिया बी इमरान अली सैयद, उपशिक्षिका श्रीमती नाहीद कौसर मलक बशीर अहेमद, उपशिक्षिका मो. परवेज मो. हारून, उपशिक्षक
पिंजारी शकील अहेमद शेख अयुब, उपशिक्षक
शोएब खान सुलतान खान उपशिक्षक
नदीम खान अहेसान खान, प्रयोग शाळा सहायक
सईद अब्दुल रशीद, लिपीक शेख मोहसीन शेख हाशम, उपशिक्षक.यांची मान्यता थांबवण्यात आली आहे .काही शिक्षक व कर्मचारी यांनी मे. उच्च न्यायालयल खंडपिठ औरगाबाद येथे मान्यता मिळणे बाबत याचिका दाखल केलेली होती. सदर याचिकेचा निकाल दिंनाक २७/०९/२०२३ देवून सदर प्रकरणी १२० दिवसात मान्यता देणे बाबत या स्तरावरून उचित निर्णय घेणे बाबत शिक्षण अधिकारी यांना कळविण्यात आले होते. त्यानुसार ४/१/२०२४ रोजी सुनावणी
घेवून – मा.धर्मदाय आयुक्त यांना पत्र देवून अधिकृत कार्यकारणी बाबत विचारणा करण्याचे ठरविण्यात आले. व त्यानुसार या कार्यालयाचे दिनाक १०/१/२०२४ रोजी मा. धर्मदाय आयुक्त यांना पत्र देण्यात आले.

उपरोक्त न्यासाचे बदल अर्ज सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांचे न्यायालयात न्यायप्रविष्ठ व प्रलंबित आहेत. तसेच या बाबत आदेश पारित करण्यात आलेला आहे की. सदर न्यासाचे उपरोक्त नमूद बदल अर्ज या अधिकारितेकडे प्रलंबित आहे. सबब सद्या वैद्य कार्यकारणी कोणती आहे यावर भाष्य करता येत नाही. तक्रार अर्जा वर निर्णय आपले स्तरावर घेण्यात यावा असे कळविलेले आहे. सदर सस्थेतील वैयक्तीक मान्यता देणे बाबतचे प्रस्तावावर या कार्यालया कडून तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी
मे.उच्च न्यायालयाचे निर्देशा नुसार या कार्यालया कडून निर्णय घेण्यात येतो की, मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कुल व ज्यू कॉलेज चोपडा या संस्थेत कार्यकारणी बाबत वाद असून तक्रारी देखिल प्राप्त आहेत.

धर्मदाय आयुक्त जळगांव यानी शेडयूल अ वर कोणती कार्यकारणी आहे या बाबत भाष्य करण्यास नकार दिलेला आहे. सदर प्रकरण माननीय धर्मदाय आयुक्त यांच्याकडे न्यायप्रविष्ट असल्याचे कळविले आहे म्हणून संबंधित संस्थेचे अधिकृत कार्यकारणीचा निकाल लागेपर्यंत व वाद मिटेपर्यंत संस्थेतील कोणत्याही भरती प्रक्रियेत व वैयक्तिक मान्यता सद्या स्थितीत देता येणार नाही असे आदेश शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण यांनी दिले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More