चोपडा तालुक्यातील कर्जाणे येथून मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटयास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.

चोपडा तालुक्यातील कर्जाणे येथून मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटयास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.

जिल्ह्यात सध्या मोटार सायकल चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने सदर आरोपीतांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश डॉ. महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दिले.

त्यावरुन बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोह संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, गोरख बागुल, राहुल बैसाणे, प्रमोद ठाकुर सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.

वर नमुद पथकातील पोह संदिप पाटील व प्रविण मांडोळे हे पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना माहिती मिळाली की, दिपक सुमाऱ्या बारेला रा.कर्जाणा ता. चोपडा हा चोरीची मोटार सायकल घेवून फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक हे दोन दिवसापासून त्यांचे मागावर होते परंतु तो पोलीसांची नजर चुकवून त्याची ओळख लपवून वावरत होता. परंतु वर नमुद पथकातील अमंलदार देखील तिथेच ठाणमांडून होते. दिनांक ०८/०९/२०२४ रोजी दिपक सुमाऱ्या बारेला हा त्याचे घरी कर्जाणा येथे आला असून तो दुपारून गावातून पळून जाण्याचा मार्गावर असतांना वर नमुद पथकाने कर्जाणा गावाचे बाहेर मेलाणे गावाजवळ त्यास शिताफिने पकडून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिपक सुमाऱ्या बारेला, वय २९, रा. कर्जाणा ता. चोपडा जि. जळगाव असे सांगुन त्याचे जवळचे मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने त्याचे जवळची युनीकॉर्न मोटार सायकल ही पाचोरा येथून चोरी केल्याचे सांगीतले. त्यावेळी त्यास अजुन विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने पाचोरा, पारोळा पो.स्टे. मोहाडी ता.जि.धुळे पो.स्टे.  तसेच इतर २ मोटार सायकल धरणगाव व राजपुर जि. बडवाणी येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी दिपक सुमाऱ्या बारेला, वय २९, रा. कर्जाणा ता. चोपडा जि. जळगाव याचे कडून जप्त केलेल्या ६ मोटार सायकल सह वैद्यकिय तपासणी करून पुढील तपासकामी पाचोरा पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More