चोपडा येथील पुरवठा विभाग विरुद्ध असंतोष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तहसीलदारांना निवेदन
चोपडा येथील पुरवठा विभागात मागील दोन वर्षापासून प्रलंबित स्वतंत्र दिव्यांग , विभक्त आणि नवीन शिधपत्रिका मिळवण्यासाठी तालुक्यातील नागरिकांना वारंवार तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिझवावे लागत आहे याकडे मात्र महसूल अधिकारी यांचा निदर्शनास आणून दिल्या नंतरही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

ह्या अनुषंगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे मा.अरुणभाई गुजराथी माजी आमदार कैलास पाटील चो ,सा,का चेअरमन चंद्रहास भाई गुजराथी यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट तालुका उपाध्यक्ष तर्फे शेख नईम यांनी अन्न सुरक्षाकायदा अधिनियम २०१३ नुसार नियमाप्रमाणे आदेश मिळून सुद्धा लाभार्थ्यांचे २ किंवा ३ थंम घेतात. लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडे जावून सुद्धा ते त्यांना उडवा उडवीची उत्तरे देतात मागील २ वर्षापासून तहसिल कार्यालयात दिव्यांग स्वतंत्र शिधापात्रीकासाठी नागरिकांनी अर्ज सादर केलेले आहेत. तरी आपण दिव्यांग नागरिकांसाठी उपाययोजना करून त्यांना लवकरातलवकर बी.पी. एल शिधापत्रिका देण्यात यावे.

तसेच काही महिन्यापासून विभक्त व नवीन शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन आपल्या कार्यालयात अर्ज सादर केलेले आहेत. हा विषय सुद्धा मार्गी लावावा तसेच याविषयात स्वतः लक्ष देवून या विषयास मार्गी लावावे अन्यथा चोपडा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर्फे १ दिवसीय तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन तहसिल कार्यालयासमोर करण्यात येईल अश्या आशयाचे निवेदन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आले ह्यावेळी लुकाध्यक्ष शशिकांत पाटील युवक तालुकाध्यक्ष डॉक्टर भरत धनगर नईम शेख युवक तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष चोपडा युवक शहराध्यक्ष समाधान माळी मोहसीन अली हैदर अली शाहरुख सईद जागीदार प्रवेज शेख जमील कुरेशी मुबशीर मलिक अतहार मिर्झा उपस्थित होते













