64 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात चोपडा येथील कलाकृती ची निवड

64 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात चोपडा येथील कलाकृती ची निवड

भगिनी मंडळ, चोपडा संचालित,ललित कला केंद्र, चोपडा येथील कला संचालनालय महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित 64 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात चार कलाकृतींची निवड करण्यात आली. यामध्ये पायाभूत वर्गातून प्रमोद महेश वारुळे – नगाव ता. पारोळा याची दोन चित्रे एक स्मरण चित्र व एक वस्तू चित्र तर ए.टी.डी. प्रथम वर्ष वर्गातून माळी युवराज पुनमचंद, साकळी ता. यावल याचे दुर्मिच द्विमित्त संकल्प हे चित्र तर मोहिनी हीरालाल जाधव बबळाज ता.शिरपुर हिचे वस्तू चित्र असे एकूण चार चित्र निवड करण्यात आली.


यावर्षी सदरचे हे प्रदर्शन नागपूर येथील शासकीय कला महाविद्यालय, लक्ष्मी नगर,दीक्षा भूमी जवळ,नागपुर येथे आयोजित करण्यात आले असून हे दिनांक 10 जानेवारी ते 17 जानेवारी 2025 पर्यंत हे सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्रातून जवळपास 400 कलाकृती आल्या आहेत.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे ललित कला केंद्राचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेच्या अध्यक्षा सौ. पूनम गुजराथी व सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More