प्रभावी अध्यापन, समुपदेशन व मूल्यशिक्षणावर भर देणारी दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

प्रभावी अध्यापन, समुपदेशन व मूल्यशिक्षणावर भर देणारी दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न…


चोपडा प्रतिनिधी:
पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने दि. १२ व १३ जून रोजी दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आधुनिक अध्यापन तंत्र, बालमानसशास्त्र, वक्तृत्व कौशल्य, समुपदेशन आणि मूल्यशिक्षण यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या घटकांवर यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सखोल मार्गदर्शन केले.


कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रथम सत्रात (१२ जून) प्रवीण भदाणे ( पिंपळकोठा ) यांनी “बालमानसशास्त्र व अध्यापन कौशल्य” या विषयावर शिक्षकांशी संवाद साधला. त्यांनी बालकांचा मानसिक विकास, त्यांच्या शिकण्याच्या पद्धती, वयोगटानुसार अध्यापन पद्धतीत असलेले बदल तसेच शिक्षकांनी वापरायच्या कल्पक व प्रभावी अध्यापन तंत्रांची माहिती दिली.


त्यानंतर द्वितीय सत्रात प्राचार्य डॉ. संजीव गिरासे (स्व. अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालय, म्हसदी, ता. साक्री जि. धुळे) यांनी “वक्तृत्व आणि अध्यापन कौशल्य” या विषयावर अनुभवसिद्ध आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षकांच्या सादरीकरणशैली, भाषा, आत्मविश्वास आणि प्रभावी संवादकौशल्य यावर भर दिला.


दुसऱ्या दिवशी (१३ जून) प्रथम सत्रात ब्रह्माकुमारीज डॉ. वैष्णवी खैरनार (जळगाव) यांनी “शिक्षण क्षेत्रासाठी प्रभावी समुपदेशनाचे तंत्र” या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशनाचे महत्त्व, संवादातील समजूतदारपणा, श्रवण कौशल्य, आणि समुपदेशनामधील व्यावहारिक तंत्रे त्यांनी प्रात्यक्षिकासह स्पष्ट केली.


द्वितीय सत्रात, ब्रह्माकुमारीज शीतल बेलदार ( चोपडा ) यांनी “मूल्यशिक्षण – काल, आज आणि उद्या” या विषयावर सर्जनशील पद्धतीने सादरीकरण केले. जीवनमूल्यांचा अभ्यास, नैतिक शिक्षण, मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये जाणीवपूर्वक रुजवणूक यावर त्यांनी विविध अ‍ॅक्टिव्हिटी व उदाहरणांद्वारे उपस्थितांना प्रभावीपणे समजावून सांगितले.
सदर कार्यशाळेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी सर्व विभागप्रमुख, शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


या कार्यशाळेच्या माध्यमातून शिक्षकांनी आपल्या अध्यापन पद्धतीत नाविन्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारण्याची प्रेरणा घेतली. शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे प्रशिक्षणार्थींनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More