शाह- ठाकरे भेट रद्द होण्याची शक्यता युती होणार की नाही?

शाह- ठाकरे भेट रद्द होण्याची शक्यता युती होणार की नाही?

मुंबई : शनिवारी निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या. निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर याचे थेट पडसाद राजकीय पटलावर पाहायला मिळाले आणि एकाच प्रश्नाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं. तो प्रश्न म्हणजे शिवसेना- भा.ज.पा. युतीचं काय ?,अमित शाह रविवारी म्हणजेच, २२ सप्टेंबरला मुंबईत येणार आहेत. पण, त्यांच्या या दौऱ्यात त्यांची आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होण्याविषयी कोणतीच स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे तूर्तास रविवारी सेना- भा.ज.पा.युतीची घोषणा होणार नाही असंच चित्र समोर आलं आहे.शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या रुपरेषेनुसार त्यांचे काही कार्यक्रम ठरलेले आहेत. ज्यामध्ये भाषण, मेगा भरती आणि त्यानंतर राजभवनात विश्रांती असे एकंदर कार्यक्रम असल्याचं कळत आहे. यामध्ये कुठेच ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चिन्ह नाहीत. त्यामुळे ही भेटच झाली नाही तर, पुन्हा एकदा युतीचा हा तिढा नेमका सुटणार तरी कधी असाच प्रश्न पुढे येत आहे.एकिकडे कोणत्या मतदार संघात किती जागांवर कोणते उमेदवार उभे करायचे, त्यासाठीची आकडेवारी नेमकी कशी असेल अशी गणितं सुरु असतानाच आता दुसरीकडे युती तुटणार का ? असा प्रश्नही डोकं वर काढू लागला आहे. त्यामुळे आता निवडणुकांच्या तारखांची उत्सुकता शमली आणि युतीचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, असं चित्र समोर येत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More