चोपडा नगरपरिषद अर्थसंकल्प सन २०२१-२०२२चोपडा नगरपरिषदेचा शिल्लकी अर्थसंकल्प मंजूर.

चोपडा नगरपरिषद अर्थसंकल्प सन २०२१-२०२२
चोपडा नगरपरिषदेचा सर्वसमावेशक रु.३,७८,२१३/- मात्रचा शिल्लकी अर्थसंकल्प मंजूर.


चोपडा(प्रतिनिधी)दि.११ रोजी संपन्न झालेल्या मे. सर्वसाधारण सभेच्या अर्थसंकल्पीय विशेष सभेत नगरपरिषदेचा ३,७८,२१३/- मात्र चा शिल्लकी अर्थसंकल्पास मंजूरी प्रदान करणेत आली.


सर्वसाधारण सभेच्या अर्थसंकल्पीय विशेष सभेत मंजूर अर्थसंकल्पाचा जमा बाजू प्रारंभिक शिल्लक ४७५५१३, महसुली जमा २५८५९२७०० भांडवली जमा – १६४८८४६९८२ ,असाधारण ऋण व निलंबन लेखे- ३९८४७००० एकुण जमा (म.+भां+अ.नि.) – १९४७७६२१९५ खर्च बाजू महसुली खर्च – २२३४४०००० भांडवली खर्च – १६८४०९६९८२
असाधारण ऋण व निलंबन लेखे – ३९८४७००० एकुण खर्च – १९४७३८३९८२ अखेरची शिल्लक – ३७८२१३ सदर अर्थसंकल्प मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी दि.१८/१२/२०२० मा. नगराध्यक्षा सौ. मनिषा जिवन चौधरी यांचेकडेस सादर केला.

तद्नंतर दि. २२/१२/२०२० रोजी नगराध्यक्षा सो., यांनी तो स्थायी समितीस मंजूरीसाठी सादर केला. स्थायी समितीने आपले शिफारशीसह तो दि. ३१/१२/२०२० चे सभेत मंजूर केला व सर्वसाधारण सभेच्या मंजूरीसाठी सादर करणेत आला. त्याअनुषंगाने दि.११/०२/२०२१ रोजी सर्वसाधारण सभेच्या अर्थसंकल्पीय विशेष सभेत त्यास बहुमताने मंजूरी प्रदान करणेत आली.

अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदी व ठळक वैशिष्ट्येi) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच शहरातील कॉलनी भागासाठी नविन स्वतंत्र ०३ जलकुंभाचे कामे अंतिम टप्यात आहे. प्रकल्पाचा ६४ कोटी पैकीचा तिसरा हप्ता रु. १८ कोटी १७ लक्ष अनुदान प्राप्त होणार आहे,पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल योजना रु. ८ कोटी ३७ लक्ष ५० हजार मात्रची तरतूद, हद्दवाढ अंतर्गत रस्ते विकास कामांचा प्रस्ताव तयार करणेत आलेला आहे.त्याकामी रु.४० कोटी मात्रची तरतुद,महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत भुमीगत गटार, सांडपाणी व्यवस्थापन,योजना/रस्ते विकास कामांचा प्रस्ताव तयार करण्या करिता रु. ६० कोटीची तरतुद, सौर उर्जासाधने संस्थापन बाबतचा सविस्तर प्रस्तावासाठी रु. ८ कोटीची तरतुद,शहरातील रत्नावती नदी संवर्धनाचा प्रस्तावासाठी रु. ५० लक्षची तरतुद करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More