सनपुले येथे कोरोना तपासणी शिबिर संपन्न
तालुका आरोग्य अधिकारी डॉ लासुरकर यांनी दिली भेट

सनपुले येथे कोरोना तपासणी शिबिर संपन्न
तालुका आरोग्य अधिकारी डॉ लासुरकर यांनी दिली भेट

चोपडा प्रतिनिधी:- चोपडा तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे , शहरासह ग्रामीण भागात देखील दिवसेंदिवस मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत , या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक कार्यकर्ते आपापल्या प्रभागातील लोकांची कोरोनाची चाचणी तपासणी शिबीराचे आयोजन करीत आहेत . त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सनपूले या गावात नागरिकांसाठी कोविड 19 तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते


सदर शिबिरात 45 रुग्णांची तपासणी करण्यात आली पैकी 10 रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून 35 रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आली आहे .सदर तपासणी वेळी मास्क , सोशल डिस्टन्स व सॅनिटाईजर या कोविडच्या नियमावलीचे पालन करून रुग्णांची तपासणी करण्यात आली .
सदर शिबिरात रुग्णांची तपासणी आरोग्य सेवक सुनिल महाजन ,आरोग्य सेविका छाया धनगर ,जयश्री मोरे यांनी केली तर सदर शिबिरास तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी भेट दिली व उपस्थितांना कोरोनाला रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात , कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी तसेच मास्क , सोशल डिस्टन्स व सॅनिटाईजर या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत असे स्पष्ट केले . शिबिर यशस्वीतेसाठी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण गुर्जर यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More