प्रशासनाने व्यापाऱ्यांना सहकार्य करावे , शिवसेनेतर्फे तहसीलदार व मुख्याधिकारी यांना निवेदन…

प्रशासनाने व्यापाऱ्यांना सहकार्य करावे , शिवसेनेतर्फे तहसीलदार व मुख्याधिकारी यांना निवेदन…
चोपडा प्रतिनिधी :—


शासनाने कोविड – १९ या आजाराच्या व प्रादुर्भावाचा विचार करता कडक लॉक डाऊन निर्बंध लागू केले आहेत तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापने व दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे . शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे व्यापारीवर्ग पालन करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे .


चोपडा शहरातील मेन रोड भागात व्यापाऱ्यांची दुकाने व निवास आहेत. खालच्या मजल्यात दुकाने व वरच्या मजल्यावर निवास आहेत . नगरपालिकेचे कर्मचारी व्यापाऱ्यांची दुकाने तपासणी करताना घराची पण चौकशी व तपासणी करतात त्यामुळे घरात राहणाऱ्या महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर लॉकडाऊन मध्ये व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तरी आजपावेतो शासनस्तरावरून व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही तसेच दुकाने व आस्थापनाची वेळ सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत करण्यात यावी अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .



चोपडा शहरात गेल्या आठ दिवसांपासून मेन रोड परिसरातील व्यापाऱ्यांना नगरपालिकाचे कर्मचारी फार खालच्या दर्जाची वागणूक देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे .सोबत दंडात्मक कारवाई करत होती म्हणून शिवसेना शहर उपप्रमुख प्रवीण जैन यांनी माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांना संपूर्ण माहिती कळविण्याचे बोलले जात आहे. या अनुषंगाने माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी तहसीलदार व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यास सांगितले असल्याचे शिवसेना कार्यकर्त्यांनी म्हटले आहे .
निवेदन देतेवेळी शिवसेना तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील , शहरप्रमुख आबा देशमुख ,नरेश महाजन , नगर पालिका पालिका विरोधी गटनेता महेंद्र धनगर , नगरसेवक महेश पवार ,युवा सेना तालुका अध्यक्ष गोपाल चौधरी , उपशहर प्रमुख प्रवीण जैन ,सुनील बरडिया , विपिन जैन , महाविर जैन आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More