विशेष प्राविण्यासह फायनांशिअल अनेलिसिस परीक्षेत उत्तीर्ण ‘ गुंजन ‘ पुन्हा एकदा चर्चेत

विशेष प्राविण्यासह फायनांशिअल अनेलिसिस
परीक्षेत उत्तीर्ण ‘ गुंजन ‘ पुन्हा एकदा चर्चेत..


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा ( प्रतिनिधी ) –

साधारण दोन वर्षांपुर्वी लंडन येथील विश्वविख्यात युनिव्हर्सिटीत मेरीट मध्ये येऊन ( M.S.) बिझिनेस मॅनेजमेंट सायन्स मघ्ये शिक्षण घेणाऱ्या चोपडा येथील भूमीकन्येने आपल्या बुद्धीचातुर्याच्या बळावर थेट अमेरिकेत आपल्या यशाचा ‘ झेंडा ‘ रोवला आहे.सौ.शोभा शामराव पाटील (काजीपुरेकर)
यांची नात व सौ.वंदना राजेंद्र पाटील चोपडा यांची सुकन्या ‘ गुंजन ‘ आपल्या शैक्षणिक गुणांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आली आहे.यावेळी तिने अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ सेन्स फ्रान्सिस्को येथे M.S.in Financial Analysis मध्ये 94 % मार्क्स मिळवत First Class With Distinction मिळवत ती उत्तीर्ण झाली आहे.



गुंजन मुळातच लहानपणापासून अभ्यासात हुशार,आणि स्मार्ट आहे.घरात उच्चशिक्षित असं कुणी नसलं तरी घरातील वातावरण मुख्यत्वे आई सौ.वंदना आणि वडील राजेंद्र पाटील यांचा गुंजन हिच्या शिक्षणासाठी असलेला सॉफ्टकॉर्नर आणि तिच्यावर दाखवलेला विश्वास गुंजनने वेळोवेळी सार्थ ठरवला आहे.परदेशी उच्चशिक्षण घेत असली तरी आपल्या पालकांनी आपल्यावर केलेले संस्कार हेच सदासर्वदा अग्रस्थानी स्मरणात ठेवत गुंजन आपली यशस्वी वाटचाल करतांना दिसते.या यशाबद्दल बदल अमेरिकेतील सेन्स फ्रान्सिस्को येथील युनिव्हर्सिटीत नुकत्याच झालेल्या दैदिप्यमान समारंभात गुंजनचा खास गौरव करण्यात आला आहे. तिच्या यशस्वी शैक्षणिक प्रवासासाठी जिल्हाभरातून अनेकांनी तिचे कौतुक,अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More